सकाळी मालवण-सिंधुदुर्गनगरी बसवर आनंदव्हाळ येथे झाली होती दगडफेक
मालवण : (प्रतिनिधी) मालवण आगारातून सुटलेल्या मालवण ओरोस या एस टी बसवर आनंदव्हाळ येथे आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास रस्त्यावरून चालणाऱ्या दोघा अज्ञात इसमांकडून दगडफेक करण्यात आल्यानंतर गाडीचे चालक अजित भोगवेकर यांनी अज्ञात व्यक्तिविरोधात मालवण पोलिसात गुन्हा दाखल केला आहे आज मंगळवारी सकाळी ९.०५ वाजता मालवण आगारातून सुटलेली मालवण ओरोस एसटी बस आनंदव्हाळ येथे पोहचली असताना मालवणच्या दिशेने चालत येणाऱ्या दोन अज्ञात व्यक्तींनी बसवर दगडफेक केली. एसटी बसच्या समोरील काचेवर एक दगड मारण्यात आला तर ड्रायव्हर साईडने देखील एक दगड फेकण्यात आला. दगडफेक करणाऱ्या दोन्ही व्यक्तींनी आपल्या अंगावर रेनकोट परिधान केला होता तसेच कोणाला चेहरा दिसू नये म्हणून त्यांनी हॅम्लेट घातले होते मालवणहून ओरोसला जाणाऱ्या या बसमध्ये १४ प्रवासी होते. या दगडफेकीनंतर त्या दोन्ही अज्ञात व्यक्ती रस्त्यालगत असणाऱ्या भागात उडी टाकून पळून गेल्या. या दगडफेकीत एकही प्रवाशी जखमी झाला नाही मात्र दगडफेक झाल्याने प्रवाश्यांना आनंदव्हाळ येथे एस टी तून उतरविण्यात आल्याने प्रवाश्यांना पुढील प्रवासासाठी खाजगी गाड्यांचा सहारा घ्यावा लागला एस टी वर दगडफेक झाल्यानंतर याबाबतची माहिती चालक वाहकाने मालवण आगार प्रमुख सचेतन बोवलेकर यांना दिल्यानंतर श्री बोवलेकर यांनी आपले सहकारी स्थानक प्रमुख अमोल कामते यांच्यासमवेत घटनास्थळी धाव घेत पाहणी केली