कणकवली : गोव्याच्या दिशेने जात असलेल्या कारची महामार्गनजिक चालत जाणारे पादचारी विश्वनाथ लवू गावडे ( वय ४०, वागदे – गावठणवाडी ) यांना धडक बसून ते जागीच मृत झाले. सदरचा अपघात हा मुंबई – गोवा महामार्गावर वागदे येथील भालचंद्र लॉजिंग ऍण्ड बोर्डिंग समोर घडला होता. या अपघात प्रकरणी कारचालक महेश पंढरीनाथ राणे ( वय ५९ रा. सावंतवाडी सालयीवाडा ) यांच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात BNS कलम १०६/१, १२५ (A, B ), २८१, १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रविंद पन्हाळे करत आहेत.
अपघात प्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल…
