⚡कुडाळ ता.२९-: झाराप शिरोडकरवाडी येथील रहिवासी गिरण मालक प्रताप वासुदेव कुडाळकर (वय ६०) यांना फुले काढताना वीज वाहिनीचा शॉक लागून त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. ऐन गणेशोत्सव सणामध्ये ही दुर्दैवी घटना घडल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत हकीकत अशी की, प्रताप वासुदेव कुडाळकर हे देवला फुले आणण्यासाठी जवळच असणाऱ्या बागेत गेले असता रात्रभर पडणाऱ्या पावसाने विजेचा तार तूटुन पोफळीच्या झाड़ावर पडली होती. नेमकी हिच तार कुडाळकर यांच्या खांद्याला लागली आणि ते जागीच कोसळले.
याबाबत अधिक तापास पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदुम, झारापचे बिट हवालदार अनिल पाटील करत आहेत. यावेळी विज वितरणविभागचे कार्यकारी अभियंता आनंद वनमोरे यांनी घटना स्थळी भेट देउन चौकशी केली. कुडाळकर यांच्या पश्यात पत्नी, मुले असा परिवार आहे.
वीज वाहिनीच्या शॉकने झाराप येथे एकाचा दुर्दैवी मृत्यू…!
