युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत यांच्या हस्ते करण्यात आला स्पर्धेचा शुभारंभ*
*💫सावंतवाडी दि.१२-:* भाजपच्या सिंधु आत्मनिर्भर अभियान अंतर्गत निलक्रांती कृषी व मस्त्यपर्यटन संस्था व सावंतवाडी नगरपरिषद यांच्या माध्यमातून १२ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान सावंतवाडीत जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान येथे मस्त्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या मत्स्य महोत्सवात गोड्या पाण्यातील माशांची ओळख व्हावी यासाठी ‘मत्स्य शिल्प स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. आज भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत यांच्या हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. जिल्ह्यातील नामवंत शिल्पकारांनी यात सहभाग घेतला आहे. या शिल्पांच महोत्सवात प्रदर्शन भरविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. या स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी आत्मनिर्भर अभियान संयोजक अतुल काळसेकर, नगराध्यक्ष संजू परब, सभापती मानसी धुरी, जयदेव कदम, संतोष किंजवडेकर, राजू राऊळ, सुधीर आडिवरेकर, मंदार कल्याणकर, विनोद राऊळ, बंटी पुरोहित, आनंद नेवगी, विनोद सावंत, रविकिरण तोरसकर, निशांत तोरसकर आदी उपस्थित होते.