⚡बांदा ता.३०-: राज्य उत्पादन शुल्क खात्याचे जिल्हा अधीक्षक डॉ . बी . एच . तडवी सो , राज्य उत्पादन शुल्क , सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्याहून येणा – या अवैध मद्याची तस्करी रोखण्या संदर्भात इन्सुली येथे तपासणी नाक्यावर असलेल्या तसेच तात्पुरता तपासणी नाका इन्सुली येथील कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांसमवेत संशयित वाहनांची तपासणी करित असताना बांद्याहून इन्सुली च्या दिशेने येणारे चारचाकी स्विफ्ट डिझायर व्हीडीआय वाहन अचानक वळवून बांद्याच्या दिशेने गेल्यामुळे या वाहनाचा संशय आल्याने त्याचा पाठलाग करुन ओटवणे माजगांव रोडवर सदर वाहन थांबवून त्याची दारुबंदी गुन्ह्याअंतर्गत तपासणी केली असता सदर वाहन क्र . MH – 48 – A5366 च्या डीकी मध्ये ठेवलेल्या विविध बॅण्डचे गोवा बनावटीचे एकूण 08 बॉक्स असा एकूण अं . रुपये 57,120 / – किंमतीचा मदयसाठा व स्विफ्ट डिझायर व्हीडीआय क्र . MH – 48 – A5366 अं . किं . रुपये 3,00,000 / किंमतीचे वाहन असा एकूण रुपये 3,57,120 / – किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन आरोपीत इसम नामे रोहन रजनीकांत पेंडुरकर , वय ३४ वर्षे , रा.वायरी , मुस्लीम मोहल्ला , एस.टी. डेपोच्या मागे मालवण , ता . मालवण , जि . सिंधुदुर्ग यास ताब्यात घेण्यात आले . या कारवाईमध्ये निरीक्षक श्री . एस . पी . मोहिते , दुय्यम निरीक्षक श्री . तानाजी पाटील , दुय्यम निरीक्षक श्री . प्रदिप रास्कर , व सहा . दुय्यम निरीक्षक श्री गोपाल राणे तसेच तात्पुरता तपासणी नाका इन्सुली येथील कर्तव्यावर असलेले अधिकारी निरीक्षक श्री.एस.के.दळवी , दु . निरीक्षक श्री.एस.एस. गोंदकर , जवान श्री . डी . आर . वायदंडे , व जवान नि.वा. चालक श्री . डी . डी . कापसे यांनी भाग घेतला . सदर प्रकरणी पुढील तपास सीमा तपासणी नाका , इन्सुली दुय्यम निरीक्षक श्री . प्रदिप रास्कर करीत आहेत .
गोवा बनावट दारू वाहतूक प्रकरणी पोलिसांची ओटवणे येथे कारवाई…
