देवगड तालुका मराठा समाज आयोजित शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा…

⚡देवगड ता.१९-: शिवजयंती निमित्त जिल्हा परिषद केंद्र देवगड च्या विद्यार्थ्यांना मराठा समाजाचा वतीने विजयदुर्ग येथे नेण्यातआले आणि किल्ल्याचा इतिहास मुलांना सांगण्यात आला. या मोहिमेत ५५ विद्यार्थ्यांनी व ११ शिक्षकांनी सहभाग घेतला होता.

सकाळी ९ वाजता देवगड बस स्थानकातून रॅली ला सुरुवात करण्यात आली. विजयदुर्ग येथे पोचल्यानंतर विजयदुर्ग जेटी ते किल्ला अशी वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत अकलूज येथील महाविद्यालयातील विद्यार्थीदेखील सहभागी झाले होते मराठा समाज देवगडचे अध्यक्ष श्री संदीप साटम यांच्या हस्ते विजयदुर्ग किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी महाराजांबद्दल आपली मते ओघवत्या शैलीत व्यक्त केली आणि शिवगर्जनेनंतर विद्यार्थ्यांना विजयदुर्ग किल्ल्याची भ्रमंती गाईड मार्फत मार्गदर्शन करत करण्यात आली. त्यानंतर विजयदुर्ग किल्ल्याचे किल्लेदार श्री धुळप यांच्या वाड्याला भेट देण्यात आली आणि विजयदुर्ग जेटी येथील भारतीय नौदलाची युद्धनौका दाखविण्यात आली यावेळी मराठा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page