देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच सावंतवाडीत आनंदोत्सव….

फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार घोषणाबाजी

सावंतवाडी ता.३०-: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सावंतवाडी शहर भाजपकडून शिरोडा नाका येथे फटाके वाजून आनंदोत्सव साजरा केला आहे.

यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब शहराध्यक्ष अजय गोंदावळे,मनोज नाईक,आनंद नेवगी,अजय सावंत,अमित परब,केतन आजगांवकर, सुनक्या टोपले,अनिल सावंत, पिंट्या सावंत, राज वरेरकर, संजय वरेकर ,कलेक्टस फर्नांडिस; संजय गोसावी,आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page