शैक्षणिक उन्नतीसाठी नितेश राणेंच्या माध्यमातून काम करत राहू:महेश गुरव

सातरल – कासरल अंगणवाडी शाळेच्या नुतन इमारतीचे उद्घाटन

⚡कणकवली ता.३०-:
गावच्या विकासात शैक्षणिक उत्ती उन्नती झाली तरच भावी पिढी घडली जाते. त्या दृष्टीने सातरल-कासरल येथील अंगणवाडी शाळेच्या नुतन इमारत ८ लाख ५० हजार खर्च करत उभारण्यात आली आहे.या नव्या वास्तूमधून चांगले विद्यार्थी घडावेत,ही आम्हा सर्वांची इच्छा आहे.भविष्यात सातरल-कासरलच्या शैक्षणिक उन्नतीसाठी आ.नितेश राणेंच्या माध्यमातून काम करत राहणार असे प्रतिपादन माजी उपसभापती महेश गुरव यांनी केले.

कणकवली तालुक्यातील सातरल – कासरल अंगणवाडी शाळेच्या नुतन इमारतीचे उद्घाटन कणकवली पंचायत समितीचे माजी उपसभापती महेश गुरव यांच्या हस्ते फित कापून तर केंद्रप्रमुख श्री. मसुरकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी सातरल सरपंच प्रदिप राणे, कासरल सरपंच गुरु चव्हाण, कासरल उपसरपंच पंढरी परब, सातरल तंटामुक्ती अध्यक्ष सदाशिव राणे, सातरल ग्रा. सदस्य दत्ताराम आमडोस्कर, राजेश मेस्त्री, कासरल ग्रा. सदस्य विनोद परब, आशिये ग्रा.प. सदस्य प्रवीण ठाकूर , सत्यवान गुरव, अंगणवाडी सेविका सौ. तांबे , मदतनीस श्रीम. राणे , पूर्ण प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व विद्यार्थी वर्ग तसेच ग्रामस्थ समीर राणे, चंद्रकांत राणे, सुशिल राणे, बाबाजी राणे, सुशिल तिर्लोटकर उपस्थित होते. श्री. दत्ता सावंत सर यांनी या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार मानले.

You cannot copy content of this page