जिल्हा बँकेचा उद्या वर्धापन दिन

विविध कार्यक्रमांचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी ता ३०
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ३९व्या वर्धापन दिनानिमित्त व कृषी दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील दुग्ध संस्थांच्या पशुपालकांना प्रोत्साहन देण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी श्वेत गंगा संवाद या कार्यक्रमाचे आयोजन १ जुलै २०२२ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा माध्य. व उच्च माध्य. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. सिंधुदुर्गनगरी सभागृह येथे करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाला सर्व दुग्ध संस्थांच्या पशुपालकांनी उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांनी केली आहे.

    जिल्ह्यातील दुग्ध संस्थांच्या पशुपालकांना प्रोत्साहन देण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी श्वेत गंगा संवाद या कार्यक्रमाचे आयोजन १ जुलै २०२२ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा माध्य. व उच्च माध्य. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. सिंधुदुर्गनगरी सभागृह येथे सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे.  या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन  होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील यशस्वी दूध उत्पादक शिंदेवाडी चे योगेश खराडे व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान चे डॉ प्रसाद देवधर हे या कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत.
You cannot copy content of this page