व्हिकटोरिअस संघ ठरला उपविजेता
*⚡कणकवली ता.०४-: एन.बी.एस.चॅरिटेबल ट्रस्ट कणकवली संचलित सिंधुगर्जना ढोलताशा पथकने सिंधुगर्जना चषक 2022 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन ब्राम्हणदेव मंदिर कनकनगर येथील मैदानात केले होते. या स्पर्धेचा अंतिम सामना बर्निंग फायर संघ विरुद्ध व्हिकटोरिअस संघ यांच्या झाला. यामध्ये व्हिकटोरिअस संघाचा पराभव करत बर्निंग फायर संघाने सिंधुगर्जना चषकावर आपले नाव कोरले.
या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभावेळी प्रमुख अतिथी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष व कणकवलीचे ब्रँडअॅम्बेसेडर दीपक बेलवलकर, राजश्री रावराणे, रोटरी क्लब ऑफ कणकवलीचे माजी अध्यक्ष लवु पिळणकर आणि साहित्यिक महेश काणेकर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेता व उपविजेत्या संघाला चषक देण्यात आले. उत्कृष्ट फलंदाज चैतन्य निग्रे, उत्कृष्ट गोलंदाज नितीन चव्हाण आणि उल्लेखनीय कामगिरी रोहित मर्तल यांना गौरविण्यात आले.
या स्पर्धेचे पंच म्हणून तन्मय सरूडकर, रोहीत म्हापसेकर, वैभव म्हापसेकर यांनी काम पाहिले. क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन डॉ. खोचरे आणि सौ. खोचरे व सिंधुगर्जना पथकाच्या अध्यक्षा सुरेखा भिसे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रा. हरीभाऊ भिसे, सिंधुगर्जना पथकाचे कार्याध्यक्ष सर्वेश भिसे, विजय शिंदे, व्हिकटोरिअस संघमालक कृतिका सावंत, पथक प्रमुख नितीन चव्हाण, बर्निंग फायर संघमालक सिद्धेश्वर करंबेळकर, पथक उपप्रमुख प्रज्ञेश निग्रे, गुरुकृपा संघमालक शुभम पवार, पथक महिलाप्रमुख रिदा मन्सुरी, समीर सुपर किंग्स संघाचे कर्णधार समीर कांबळे उपस्थित होते.
