सावित्रीबाईंनी दाखविलेल्या वाटेवरून चालण्याचा सामूहिक संकल्प
*⚡कणकवली ता.०४-:* बाबा भालचंद्र अपार्टमेंटच्या महिला गु्रपने सावित्रीचा जन्म दिवस हाच ‘आमचा दिवाळी’नी ‘दसरा’म्हणत दारात रांगोळी, पणती, विद्युत दिव्यांची रोषणाई करत सावित्री उत्सवाचा आनंद घेत घेत खर्या अर्थाने नववर्षाच्या पहिला सण साजरा केला. या महिला ग्रुपने आगळा वेगळा उपक्रमाची सुरुवात करून वैचारिक उत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला.
शेणा, दगडाचा मारा झेलत स्त्रियांच्या शिक्षणाची आणि सार्वजनिक सत्यधर्म पुढे नेण्याची अवघड वाट चालत राहिली म्हणूनच आज आपली प्रशस्त वाट तयार झाली या वाटेवरून चालताना सावित्रीबाई फुले यांची आठवण जागवायला हवीच! पण त्याच बरोबर, स्त्रियांची निंदा करणारे , त्यांना कमकुवत लेखणारे चमत्काराची अभिलाषा दाखविणारे ग्रंथ वाचने, पारायणे करणे नाकारले पाहिजे. तसेच रुढी-परंपरा वादी विचारांचे उदात्तीकरण करणारे सण समारंभ ही झुगारून देऊन सावित्री उत्सवाची सुरूवात करायला हवी म्हणून अर्पिता राजेंद्र मुंबरकर, मीना प्रसाद घाडीगांवकर, सुगंधा कारेकर, सुवेदिता घाडीगांवकर या महिलांनी सावित्रीबाईंनी दाखविलेल्या वाटेवरून चालण्याचा सामूहिक संकल्प घेऊन असा आगळावेगळा उपक्रमाचा रिवाज सुरू केला आहे.
