Headlines

वेंगुर्ला तालुका कृषी विभागामार्फत परुळे येथेबेकायदेशीर खतविक्रीवर कारवाई

तालुक्यात तिसरी कारवाई ; अवैध 62 हजार 980 रु. किंमतिचा खतसाठा जप्त

वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यातील
परुळे येथे बेकायदेशीर खत साठवणूक व विक्रीवर वेंगुर्ला तालुका कृषी विभाग मार्फत मंगळवारी सकाळी 11.25 वा. कारवाई करण्यात आली आहे. बेकायदेशीर खत विक्रीवरील या हंगामातील ही तिसरी कारवाई आहे. याप्रकरणी प्रकाश बाळासो मोहिते (कृषी अधिकारी गुण निंयत्रण) तालुका कृषी अधिकारी कार्यालय, वेंगुर्ला यांनी निवती पोलीस स्थानकात मंगळवारी 18 ऑगस्ट रोजी फिर्याद दिली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयात अनिल धोंडू परब ( रा. परुळे, गवाण )यांनी अजीत चंद्रकांत शिरसाट (रा. परुळे, ता. वैगुर्ला) हे बेकायदेशिरपणे खत विक्री, चढ्यादराने खत विक्री, भेसळयुक्त खत विक्री व खतांची साठेबाजी करुन खतांची कृत्रिम टंचाई र्निमाण करीत आहेत, अशी तक्रार देण्यात आली होती. जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी यांनी सदरचे कार्यक्षेत्र हे कृषी अधिकारी, गुणनियंत्रण वेंगुर्ला यांच्या अखत्यारीत येत असल्याने सदरचा अर्ज पुढील कारवाईसाठी कृषी अधिकारी, गुणनियंत्रण वेंगुर्ला यांच्या नावे तालुका कृषी अधिकारी वेंगुर्ला या कार्यालयात पाठविला होता. त्या अर्जाच्या अनुषंगाने मंगळवार दि. 18 ऑगस्ट रोजी सकाळी 11.25 वा. प्रकाश मोहिते यांनी परुळे येथे ही कारवाई केली.
अजित चंद्रकांत शिरसाट यांच्या पंचासमक्ष एका खोलीत तपासणी केली असता खोलीमध्ये खतसाठा आढळून आला. त्याबाबत अजित चंद्रकांत शिरसाट ( वय 65 वर्षे, रा. परुळे बाजारवाडी ता. वेंगुर्ला) यांच्याकडे सदर खतसाठा व विक्रीबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगीतले की, खतांचा साठा विक्रीच्या उद्देशाने आणला असून आपण त्याची विक्री करीत असल्याचे पंचासमक्ष कबुल केले. तसेच साठवणूक व विक्री संबधी परवाना घेतला आहे काय? असे विचारले असता त्यांनी कोणताही वैध परवाना आपल्याकडे नसल्याचे पंचासमक्ष सांगीतले. यावेळी खोलीत
62,980 रु. किंमतिचा मुद्देमाल खतसाठा आढळून आला आहे. हा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील कार्यवाही सुरु आहे.
यावेळी परुळे सहाय्यक कृषी अधिकारी सूरज परब,
परुळे सरपंच प्रणिती आंबडपालकर,
चिपी -परुळे पोलीसपाटील संदेश पवार, कर्ली पोलीसपाटील जान्हवी खडपकर, गवाण पोलीस पाटील श्वेता चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी
33,600 हजार रु. किंमतीच्या 18:18:10 या ग्रेडच्या रासायनिक खतांच्या बसंत अग्रोटेक लिमीटेड या कंपनीच्या 50 किलो वजनाच्या 21 गोण्या,
1200 रु. किंमतीचे सिंगल सुपर फॉस्फेट पावडर प्लास्टीकच्या निळ्या ड्रममध्ये भरून ठेवलेली एकूण वजन अंदाजे 100 किलो, 5400 रु. किंमतीचे सेंद्रिय व इतर मिश्र रासायनीक खतांचे मिश्रण असलेले प्लास्टीक निळ्या ड्रममध्ये भरून ठेवलेले एकूण वजन अंदाजे 450 किलो, 12000 रु. किंमतीचे रासायनिक खत प्लास्टीकच्या निळ्या ड्रममध्ये भरून ठेवलेले एकूण वजन अंदाजे 400 किलो, 1200 रु. किंमतीचे युरीया खत प्लास्टीकच्या निळ्या ड्रममध्ये भरून ठेवलेले एकूण वजन अंदाजे 150 किलो, 8250 रु. किंमतीचे 15:15:15 या ग्रेडच्या रासायनिक खतांच्या आर. सी. एफ कंपनीच्या 50 किलो वजनाच्या 5 गोण्या,
630 रु. किंमतीचे सिंगल सुपर फॉस्फेट पावडर श्री पुष्कर केमीकल्स अॅन्ड फर्टीलायझर लिमीटेड या कंपनीची 50 किलो वजनाची 1 गोणी, 700 रु. किंमतीचे मायसीग्रीन असे लेबल असलेली त्यावर निंबोळी पेंडयुक्त नैसर्गिक सेंद्रिय खत असे लिहीलेले हिंदुस्थान अँग्रो केमिकल्स अॅन्ड फर्टीलायझर लिमीटेड या कंपनीची 50 किलो वजनाची 1 गोणी असे एकूण 62 हजार 980 रुपये एकूण किंमतीचा मुद्देमाल खतसाठा आढळून आला आहे. त्याची मोजदाद करुन जप्त करण्यात आला आहे. दि. 18 ऑगस्ट रोजी 11.25 वा. च्या सुमारास परुळे बाजारवाडी ता. वेंगुर्ला येथे अजित चंद्रकांत शिरसाट( वय 65 वर्षे, रा, परुळे बाजारवाडी ता. वेंगुर्ला) हे सेंद्रीय व रायायनिक खतांचा साठा विनापरवाना विक्रीच्या उद्देशाने बाळगलेल्या स्थितीत आढळून आल्याने निवती पोलीस स्थानकात प्रकाश मोहिते यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी
निवती पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय सायमन डिसोजा हे पुढील तपास करीत आहेत.

You cannot copy content of this page