Headlines

ओझर विद्यामंदिरच्या माजी विद्यार्थ्यांतर्फे शिक्षक जयसिंगराव जाधव यांचा सन्मान

मालवण : (प्रतिनिधी)

कांदळगाव येथील ओझर विद्यामंदिरच्या माजी विद्यार्थ्यांतर्फे दरवर्षी शाळेत अध्यापन केलेल्या शिक्षकांचा सन्मान करण्याची परंपरा जपली जात आहे. यावर्षी माजी विद्यार्थी उमेश कोदे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकारातून ओझर विद्यामंदिर, कांदळगाव येथे माजी शिक्षक जयसिंगराव गणपती जाधव यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी उमेश कोदे यांनी लिहिलेला ‘गुरुवरा हृदयेश्वर तू खरा” हा लेख जाधव यांना समर्पित करण्यात आला. नंतर सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन जयसिंगराव जाधव यांचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमास ओझर विद्यामंदिरच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती यू. डी. मुरवणे, सौ. एस. एस. पेडणेकर, माजी विद्यार्थी तथा समाज कल्याण सहआयुक्त श्यामसुंदर पेडणेकर, माजी प्राथमिक शिक्षिका अंजली अशोक कांदळगावकर, माजी प्राथमिक शिक्षक सदानंद कांबळी, केंद्रप्रमुख प्रशांत पारकर, पंचायत समिती सदस्या योजना कांबळी, शालेय समिती सदस्य जयराम कांबळी, माजी विद्यार्थी व अभिनेते बाळ नरे, आर. पी. बागवे हायस्कूल, मसुरेच्या शिक्षिका अर्चना उमेश कोदे, ओझर विद्यामंदिरचे मुख्याध्यापक डी. डी. जाधव, पी. के. राणे, लिपीक रविराज जाधव, कर्मचारी मधुसूदन परुळेकर, विमा प्रतिनिधी सच्चिदानंद गोलतकर तसेच १९८०-८१ बॅचचे माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी, ग्रामस्थ व माजी विद्यार्थी उपस्थित होते.

ओझर विद्यामंदिरचे माजी विद्यार्थी किशौर नारायण, नरे, एस. एस. पेडणेकर, यू. डी. मुरवणे, बाळ नरे, सदानंद कांबळी, पं.स. सदस्या योजना कांबळा, प्रशांत पारकर यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन पी. आर. पारकर यांनी केले. आभार उमेश कोदे यांनी मानले.

You cannot copy content of this page