*⚡कणकवली ता.०४-:* कणकवली तालुक्यातील जि. प. पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा खारेपाटण नं.१ या शाळेत नुकताच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९१ व्या जयंतीचे औचित्य साधून बालिका दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला खारेपाटण केंद्र शाळेच्या पदवीधर शिक्षिका श्रीम.अर्चना तळगावकर, संजय राऊळ, सहायक शिक्षिका श्रीम.स्मिता कोरगावकर,श्रीम.अलका मोरे, श्रीम.रेखा लांघी, श्रीम.रुपाली पारकर,अंगणवाडी सेविका श्रीम मोहिरे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला शाळेच्या जेष्ठ शिक्षिका श्रीम.स्मिता कोरगावकर यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यानंतर राष्ट्रीय बालिका दीना निमित्त शाळेतील विद्यर्थिनींचा मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला.यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवन चरित्रावर शालेय विद्यार्थ्यांनी सुंदर अशी भाषणे सादर केली. तर शाळेच्या शिक्षिका श्रीम.अर्चना तळगावकर व श्रीम.स्मिता कोरगावकर यांनी सावित्रीबाई फुले जयंती निमित्त व राष्ट्रीय बालिका दीना निमित्त शालेय विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले.
