*⚡कणकवली ता.०४-: पंचशील विकास मंडळ खारेपाटण पुरस्कृत व पंचशील क्रिकेट क्लब खारेपाटण आयोजित मर्यादित षटकांच्या भव्य अंडर आर्म खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन ५ जानेवारी २०२२ पासून खारेपाटण येथील केदारेश्वर मैदानावर करण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष संतोष पाटणकर यांनी दिली.
या स्पर्धेकरिता अंतिम विजेता संघाला रोख रुपये १०,०२२ /- व आकर्षक चषक तर उपविजेत्या संघाला रोख रुपये ५,०२२ /- व आकर्षक चषक देण्यात येणार आहेत.याबरोबरच स्पर्धेतील खेळाडूंकरिता मालिकविर,उत्कृष्ट गोलंदाज,उत्कृष्ट फलंदाज यांना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. ५ जानेवारी २०२२ पासून प्रारंभ होणाऱ्या या स्पर्धेची प्रवेश फी १०००/- रुपये ठेवण्यात आली असून इच्छुक जास्तीत जास्त संघांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवून सहकार्य करावे असे आवाहन पंचशील क्रिकेट क्लब खारेपाटण च्या वतीने करण्यात आले आहे.
