Headlines

मंगळागौर कार्यक्रमातून संजू परब यांना वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा…

⚡सावंतवाडी ता.१९-: श्रावण महिन्याचे औचित्य साधून सावंतवाडी शहर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.

या कार्यक्रमास शहरप्रमुख भारती मोरे, माजी नगरसेविका लोबो मॅडम, दिपाली सावंत, कीर्ती बोंद्रे, सायली होडावडेकर, लतिका सिंग, सुवर्णा गाड, प्रतिमा नाटेकर, सुप्रिया गावडे यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. यावेळी मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांसह विविध उपक्रम उत्साहात पार पडले.

You cannot copy content of this page