Headlines

विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करून शैक्षणिक प्रगती साधावी…

श्री.प्रमोद कामत:वेंगुर्ला शाळा नं. 1 येथील”अद्ययावत संगणक प्रयोगशाळा” चे उदघाट्न..

⚡वेंगुर्ला ता.१९-: बॅ. नाथ पै यांनी वेंगुर्ला येथील ज्या शाळेत शिक्षण घेतले, त्या शाळेत येण्याचा हा आमच्यासाठी
मोठा सन्मान आहे. वेंगुर्ला शाळा नं. 1 येथील
“अद्ययावत संगणक प्रयोगशाळा” ही
जिल्ह्यातील चौथी व वेंगुर्ला तालुक्यातील पहिली संगणक प्रयोगशाळा’ असून विद्यार्थ्यांनी याचा योग्य उपयोग करून आपली शैक्षणिक प्रगती साधावी, असे प्रतिपादन जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत यांनी वेंगुर्ला येथे बोलताना केले.
शिक्षण संचालक (प्राथमिक) पुणे, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे जि. प. वेंगुर्ला पूर्ण प्राथमिक शाळा नं. 1 येथे अद्ययावत संगणक प्रयोगशाळाचे
उद्घाटन सिंधुदुर्ग जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, वेंगुर्ला न.प. नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, वेंगुर्ला पं. स. सभापती शंकर घारे, भाजपा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विष्णु उर्फ पप्पू परब, अटल प्रतिष्ठान अध्यक्ष
ऍड. नकुल पार्सेकर, भेडशी येथील उद्योजक दत्ताराम उर्फ बाबा टोपले, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, नूतन गटशिक्षणाधिकारी अजय ढाणे, शिक्षण विस्तार अधिकारी संतोष गोसावी, नगरसेवक प्रणव वायंगणकर, नगरसेविका ऍड. सुषमा प्रभूखानोलकर, भाजपा जिल्हा पदाधिकारी वसंत तांडेल, वाफोली सरपंच विनेश गवस, श्री. गावडे,
केंद्रप्रमुख
विश्वनाथ जगताप,
मुख्याध्यापक ज्ञानेश्वर हरमलकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अभिषेक वेंगुर्लेकर, उपाध्यक्ष सेजल रजपूत, सावंत, शिक्षणप्रेमी संजय पिळणकर, सत्यवान साटेलकर आदी उपस्थित होते. वेंगुर्ला शाळा नं. 1 येथे झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी या कार्यक्रमात प्रमुख मान्यवर, बिडीओ, ग.शि. तसेच ‘गटशिक्षणाधिकारी’ म्हणून वेंगुर्ला तालुक्यासाठी चांगले काम केलेले शिक्षण विस्तार अधिकारी संतोष गोसावी आदींचा शाल, रोप व पुस्तक देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तसेच विविध स्पर्धातील गुणवंत विद्यार्थी यांनाही गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पिळणकर व आभार अभि वेंगुर्लेकर यांनी मानले.

You cannot copy content of this page