प्रा. भिकाजी कांबळे यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी.पदवी प्रदान

*⚡कणकवली ता.०४-:* कणकवली कॉलेज, कणकवली येथील हिंदी विभागांमध्ये कार्यरत असणारे प्रा. भिकाजी कांबळे यांना नुकतीच शिवाजी विद्यापीठाने पीएच. डी. पदवी पदवी प्रदान करून सन्मानित केले. त्यांनी “चंद्रसेन विराट कथा ब्रजेश सिंह की गजलो मे व्यक्त समसामायिकता” या विषयावरती प्रबंध सादर केला होता.

त्यांना डॉ. सुनील बनसोडे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले, प्रा. डॉ. लालासाहेब घोरपडे यांनीही मार्गदर्शन व सहकार्य केले. त्यांना प्राप्त या सन्मानाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ, कणकवलीचे चेअरमन सुरेश कामत, सचिव विजयकुमार वळंजू, विश्वस्त, सदस्य, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

You cannot copy content of this page