वेंगुर्ला प्रतिनिधी- भारतातील पहिल्या शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या आणि समस्त स्त्रियांना ज्ञानाची वाट दाखविणा-या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे आम्ही ऋणी आहोत असे प्रतिपादन वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.धनश्री पाटील यांनी केले.
येथील बॅ.खर्डेकर महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन प्रा.डॉ.धनश्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ.विलास देऊलकर, कनिष्ठ महाविद्यालयातील जाधव मॅडम, वेदिका सावंत, रेश्मा कांबळी, देशपांडे, खोत, मिनल मांजरेकर, संपदा दिक्षित, नाईक, पर्यवेक्षक दिलीप शितोळे, सांस्कृतिक चेअरमन प्रा.वामन गावडे, सुरेंद्र चव्हाण यांच्यासह प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
बालविवाह प्रतिबंध, विधवा विवाह, सती परंपरा, शिक्षण शेती, समाज सुधारणा या ज्योतिबांच्या सर्वच कार्यात सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असल्याचेही प्रा.पाटील यांनी बोलताना स्पष्ट केले.
