भाजपातर्फे सावित्रीबाई फुले व बालिका दिन साजरा

वेंगुर्ला प्रतिनिधी– सावित्रीबाई फुले यांच्या जन्म दिनानिमीत्त भाजपा तालुका कार्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शहरातील कुबलवाडा येथील राणी लक्ष्मीबाई शाळेतील मुलींना शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन बालिका दिन साजरा केला.

यावेळी महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्मिता दामले, जिल्हा उपाध्यक्ष अॅड. सुषमा प्रभूखानोलकर, माजी नगराध्यक्षा डॉ. पूजा कर्पे, नगरसेविका श्रेया मयेकर, महिला तालुका सरचिटणीस वृंदा गवंडळकर, अल्पसंख्याक सेलच्या हसीना बेन मकानदार, सैनिक पतसंस्थेच्या ज्योती देसाई उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page