वेंगुर्ला प्रतिनिधी- इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला तर्फे येथील राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेत सावित्रीबाई फुले जयंती व कन्या दिन साजरा करताना याच शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच ज्यांना फक्त मुलीच आहेत अशा मातांचा सुद्धा मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला.
यावेळी क्लब अध्यक्ष ज्योती देसाई, क्लब सेक्रेटरी स्मिता दामले, आय.एस.ओ.वृंदा गवंडळकर, एडीटर डॉ.पूजा कर्पे, सदस्य आरती गिरप, सुषमा प्रभूखानोलकर, श्रेया मयेकर, हसिनाबेगम मकानदार यांच्यासह शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
