जिल्हा भंडारी महासंघातर्फे फेब्रुवारीत वधू-वर सूचक मेळावा

*⚡वेंगुर्ला ता.०४-:* सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या झालेल्या मासिक सभेत जिल्हा भंडारी महासंघाच्यावतीने फेब्रुवारी २०२२मध्ये वधुवर सूचक मेळावा घेण्याचे ठरविण्यात आले. तारीख निश्चित झाली नसली तरी वधुवरांनी आपली नावे नोंदवावीत असे आवाहनही करण्यात आले.

वेंगुर्ला येथील साई मंगल कार्यालयात २ जानेवारी सिधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाची सभा जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सेक्रेटरी विकास वैद्य, मोहन गवंडे, विलास आसोलकर, सीताराम खडपकर, उल्हास हळदणकर, समील जळवी, राजू गवंडे, श्रीकांत वेंगुर्लेकर, दिलिप पेडणेकर, सुनील नाईक, अनंत कांबळी, मनोहर पालयेकर, निलेश गोवेकर, तुकाराम करंगुटकर, लक्ष्मीकांत मुंडीये यांच्यासह अन्य सदस्यही उपस्थित होते. जिल्हा भंडारी महसंघातर्फे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात वधुवर सुचक मेळावा घेण्याचे निश्चित करण्यात आले. यात सहभागी होणा-या वधुवरांनी आपली नावे ९६२३७२७९२० यावर कळवावीत असे आवाहन केले आहे. या सभेत निलेश गोवेकर (कणकवली) यांची सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या स्वीकृत सदस्यपदी निवड करण्यात आली. तर महासंघाच्या अजेंड्यावर असलेल्या सर्व विषयांवर चर्चा करण्यात आली. वधूवर मेळाव्याच्या अनुषंगाने जिल्हाध्यक्ष वायंगणकर यांनी सर्वांना सूचनाही केल्यात.

You cannot copy content of this page