बांद्यात राष्ट्रीयीकृत बँकांची एटीएम सेवा कोलमडली

त्वरित कार्यवाही न केल्यास अधिकाऱ्यांना जाब विचारणार;जावेद खतीब यांचा इशारा

*⚡बांदा ता.०४-:* संपूर्ण जिल्ह्यात सर्व बँकांच्या एटीएम सेवा सुरळीत असताना बांदा शहरातील सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची एटीएम सेवा वगळता राष्ट्रीयीकृत बँकांच्या एटीएम सेवेत कायमच बिघाड असल्याने ग्राहक वर्गाला याचा नेहमीच मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत त्वरित कार्यवाही करून सेवा सुरळीत न केल्यास लवकरच जाब विचारला जाईल, असा इशारा भारतीय जनता युवा मोर्चा सिंधुदुर्ग उपाध्यक्ष तथा बांदा ग्रा. पं. सदस्य जावेद खतीब यांनी दिला आहे.

प्रसिद्धीपत्रकात जावेद खतीब यांनी म्हटले आहे की, बांदा शहरातील सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची एटीएम सेवा वगळता राष्ट्रीयीकृत बँकांच्या एटीएम सेवेत कायमच बिघाड असल्याने ग्राहकांची गैरसोय होते. याबाबत वेळोवेळी संबंधित बँकांच्या शाखा धिकाऱ्यानावू कळउनही लक्ष दिला जात नाही. त्यामुळे याचा संबंधित बँकेच्या ग्राहकांना नेहमीच त्रास होतो. गेली दोन वर्षात सातत्याने शहरातील राष्टीय कृत बॅंकाच्या एटीएम सेवा ह्या शनिवार ते सोमवार या तीन दिवसात कायमच नसते. याचे नेमके कारण अद्यापही समजू शकले नाही. याबाबत बांदा शहरात असणाऱ्या राष्ट्रीयीक राष्ट्रीयीकृत बँकांच्या संबंधित शाखा अधिकाऱ्यांची संपर्क साधून तसेच निवेदने देऊनही बँकांच्या एटीएम सेवेत कोणत्याही प्रकारची दुरुस्ती झालेली दिसून येत नाही. तीनही बँकांच्या एटीएम सेवेत काहीना काही बिघाड हा असतोच. कधी कॅश प्रॉब्लम तर कधी रेंजचा प्रॉब्लेम, तर कधी एटीएममध्ये बिघाड. त्यामुळे शहरातील व बाहेरगावातील खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना याचा नेहमीच मनस्ताप सहन करावा लागत असतो.

यासाठी आम्ही ग्राहकांच्या होणाऱ्या गैरसोईबाबत भाजपाच्या वतीने वेळोवेळी संबंधित बँकांना निवेदने सादर केली. संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत जातीने लक्ष घालू अशी आश्‍वासनेही दिलीत. मात्र कारवाईच्या बाबतीत शून्य असलेल्या अधिकाऱ्यांच्या कार्यवाहीबाबत आम्ही पूर्णपणे नाराज आहोत. एक जिल्हा बँकेने चांगली सुविधा उपलब्ध करून दिली असल्यामुळे ग्राहकातून याचा उद्रेक झाला नाही. मात्र, येत्या कालावधीत या राष्ट्रीयकृत बँकांच्या तीनही एटीएमची सेवा जर सुरळीत केल्या नाहीत तर याचा जाब संबंधित बॅंकांच्या अधिकाऱ्यांना विचारावाच लागेल. यावेळी जर ग्राहक वर्गाने आपला असंतोष जाहीर केला तर याची सर्वस्वी जबाबदारी त्या त्या प्रशासनाची राहील, असा इशारा आपल्या निवेदनाद्वारे भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब याने दिला आहे.

You cannot copy content of this page