Headlines

शिरोडा “ताज” प्रकल्पामुळे तरुणांना रोजगार उपलब्ध होणार….

श्री.पप्पू परब ; भारतीय जनता पार्टीतर्फे वेंगुर्ला येथे जल्लोष

वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा वेळागर येथील
ताज हॉटेलचा मार्ग आज मोकळा झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहूप्रतीक्षित शिरोडा वेळागर येथे ताज हॉटेल उभारण्यासाठी त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी झाल्याने भारतीय जनता पार्टीतर्फे वेंगुर्ला येथे मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला. शिरोडा येथे ताज प्रकल्प साकारणार असल्याने तालुक्यातील स्थानिक व अन्य भागातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाबाबतचा झालेला निर्णय निश्चितच स्वागतारह आहे. निश्चितच मंत्री ना. नितेश राणे, आ. दिपक केसरकर, महायुतीतील प्रमुख नेते पदाधिकारी यांच्या प्रयत्नांना यश आले आहे, असे यावेळी बोलताना भाजपा तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब यांनी सांगितले. यावेळी
जि. प.शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ,
वेंगुर्ला न. प. उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, वेंगुर्ला पं. स. सभापती शंकर घारे, आसोली पं. स. सदस्य संकेत धुरी , युवा मोर्चा अध्यक्ष तथा नगरसेवक प्रणव वायंगणकर, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, तालुका सरचिटणीस तथा मच्छीमार सेलचे अध्यक्ष वसंत तांडेल, तालुका चिटणीस श्रीकृष्ण धानजी, तालुका कार्यकारिणी सदस्य संतोष अणसूरकर, नगरसेवक सुषमा प्रभुखानोलकर, शीतल आंगचेकर, सुधीर पालयेकर, युवराज जाधव, प्रितम सावंत, सदानंद गिरप, काजल कुबल,आकांक्षा परब, सचिन शेट्ये, शक्तिकेंद्र प्रमुख सायमन आल्मेडा, मयुरेश शिरोडकर, बूथ अध्यक्ष भानुदास कुबल, अर्जुन तांडेल, किशोर रेवणकर,देवेंद्र वस्त, श्याम खोबरेकर, नारायण गावडे, उपसरपंच अनंत केळजी, विश्वनाथ धुरी, सदानंद गावडे, शिरोडा माजी सरपंच मनोज उगवेकर, संतोष धानजी, युवा कार्यकर्ते मारुती दोडशानटी, युवा मोर्चा पदाधिकारी तुषार साळगांवकर, युवा नेते हितेश धुरी, गौरेश खानोलकर, गुरु राणे, हर्ष कोचरेकर, गौरेश गावडे, योगेश सरमळकर, अमित गावडे, तनिष धोंड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page