Headlines

वेंगुर्ला येथील प्रसिद्ध गणेश मूर्तीकार – चित्रकार सुदर्शन कुडपकर यांचे निधन

वेंगुर्ला
वेंगुर्ला कॅम्प भटवाडी येथील रहिवासी ज्येष्ठ श्री गणेश मूर्तीकार व चित्रकार सुदर्शन कुडपकर (वय ७४) यांचे आज शुक्रवारी दि. ३१ जुलै रोजी सकाळी दुःखद निधन झाले. कला, सर्जनशीलता आणि उत्कृष्ट कारागिरीच्या माध्यमातून त्यांनी समाजात आपला वेगळा ठसा उमटविला. त्यांच्या हस्ते साकारलेल्या गणेशमूर्ती आणि विविध कलाकृतींमुळे त्यांनी कला क्षेत्रात मानाचे स्थान मिळविले होते. त्यांच्या निधनाने कला क्षेत्राची मोठी हानी झाली असून सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त होत आहे.त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, भावजय, पुतणे, पुतण्या व नातवंडे असा मोठा परिवार आहे.वेंगुर्ला कॅम्प
भटवाडी येथील प्रसिद्ध गणेशमूर्तीकार, रांगोळीकार तसेच सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ ऊर्फ पिंट्या कुडपकर यांचे ते वडील होत.

You cannot copy content of this page