Headlines

बांदा येथे स्वलिखित पावसाळी काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन

बांदा/प्रतिनिधी
येथील नट वाचनालयाचे माजी उपाध्यक्ष (कै.) सुभाष मोर्ये यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नट वाचनालयात शनिवार दिनांक ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ३.३० वाजता स्वलिखित पावसाळी काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यापुरती मर्यादित असून ती दोन गटांत होणार आहे. पहिला गट इयत्ता पाचवी ते दहावी आणि दुसरा गट खुला राहणार आहे. स्पर्धकांनी स्वलिखित पावसाळी कविता सादर करावयाची आहे.
दोन्ही गटांतील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना रोख बक्षिसे व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी आपली नावे ७ ऑगस्ट पर्यंत ग्रंथपाल यांच्याकडे नोंदवावीत, असे आवाहन नट वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page