कुडाळमध्ये अर्ज छाननीत १६ अर्ज वैध, एक अवैध
*⚡कुडाळ ता.०४-:* कुडाळ नगरपंचायतीमध्ये चार जागांसाठी एकूण १७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. आज झालेल्या अर्ज छाननीत यातील १६ अर्ज वैध ठरले. तर एक अर्ज अवैध ठरला आहे. त्यामुळे आता ४ जागांसाठी १६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दरम्यान, अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. प्रभाग क्रमांक सतरा साठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना…
