शेखर शेणई यांना ‘महाराष्ट्र प्रतिमा गौरव‘ पुरस्कार

*⚡वेंगुर्ला ता.०४-:* पारंपारिक लोककला दशावतार आणि सामाजिक क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल वेंगुर्ला येथील ओंकार दशावतार नाट्य मंडळाचे मालक दत्तात्रय उर्फ शेखर रामचंद्र शेणई यांना इमेज इंटरनॅशनल ऑनलाईन रिसर्च सेंटरचा ‘महाराष्ट्र प्रतिमा गौरव पुरस्कार‘ जाहिर झाला होता. हा पुरस्कार ‘रात्रीस खेळ चाले‘ या मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेते माधव अभ्यंकर यांच्या हस्ते २६ डिसेंबर २०२१ रोजी कोल्हापूर येथील कला, साहित्य, सामाजिक लोकसंवाद प्रतिमा संमेलनात श्री. शेणई यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

श्री.शेणई यांनी ओंकार दशावतार नाट्य मंडळाची स्थापना करुन त्यामार्फत गेली ३२ वर्षे आपली कला सादर करताना अनेक दशावतारी कलाकारही घडविले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे. या पुरस्काराबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page