जिल्ह्यात लसींचा तुटवडा नाही

दहा दिवसांत १५ ते १८ गटातील लसीकरण पूर्ण करणार;पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती

*⚡सिंधुदुर्ग ता.०४ विनय वाडकर-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाच्या सुरुवात झाली असून, अंदाजे 40 हजार मुलांना लस दिली जाणार आहे. येत्या 10 दिवसात या मुलांना लसीकरण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असणार असून, यासाठी सद्यस्थितीत आमच्याकडे 66600 लसीची मात्रा उपलब्ध असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी झूम ॲप द्वारे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

तसेच यावेळी ते पुढे म्हणाले की, 60 वर्षांवरील व्याधीग्रस्त वृद्धांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि फ्रंड लाईन वर्कर यांना बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, 10 जानेवारी पासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

यावेळी ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात ज्या संख्येने पुन्हा एकदा रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे तिसरी लाट सुरू झाली असून, त्याला रोखण्यासाठी महाराष्ट्र सोबत सिंधुदुर्ग जिल्हा देखील तयार असून, तिसऱ्या लाटेला रोखण्याची सर्व तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडू नये यासाठी 8 प्लांड तयार करण्यात आले असून, त्यातील 6 पूर्ण क्षमतेने तयार आहेत तर 2 प्लांड चे काम सुरू आहे. तसेच ऑक्सिजन रिफिलंग प्लांड देखील तयार करण्यात येत आहे. जिल्ह्यात 984 डीसीएचसी बेड असून, त्यातील 800 ऑक्सिजन बेड आहेत. 917 सीसीसी बेड आहेत. तर प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये नव्याने 20 ते 30 बेड तयार करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सद्य स्थितीत एकूण 1900 बेड तयार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचे निर्बंध लावण्याचे झाल्यास जिल्यातील सर्व लोकप्रतिनिधी, पक्षीय पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, संघटना, यांना विचारत घेऊन त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल तसेच लॉक डाऊन करायचे झाल्यास सर्वांना विश्वासात घेतले जाईल अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी नियमावलीचे पालन करून सुरू झालेल्या तिसऱ्या लाटेला वेळीच आवर घाला असे आवाहन नागरिकांना केले आहे.

You cannot copy content of this page