*⚡वेंगुर्ले ता.०४-:* वेंगुर्ला तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी शिक्षकांतील कलागुणांना वाव देण्यासाठी व कोविड १९च्या त्रासातून शिक्षकांना उभारी मिळावी, या उद्देशातून वेंगुर्ल्यातील सर्व प्राथमिक शिक्षक कलामंचची स्थापना केली.
या माध्यमातून ‘भौमासूर वध‘ हे दशावतारी नाटक सादर करुन त्या नाटकांतून जमा झालेली १ लाख रुपयांची रक्कम ही कोरोनामुळे पालकांचे छत्र हरपल्याने अनाथ झालेल्या मुलांना देण्यात येणार आहे. ही रक्कम पोष्टाच्या किसान पत्राच्या स्वरुपात ८ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता साई मंगल कार्यालयात वितरीत केली जाणार आहे.
