कणकवली 4 जानेवारी (प्रतिनिधी)- शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ल्याप्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या सचिन सातपुते या संशयित आरोपीला आज कणकवली न्यायालयात हजर केले. असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.संशयित आरोपी सचिन सातपुते याची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला कणकवली न्यायालयात दुपारी हजर करण्यात आले. आरोपीच्या वतीने अँड हर्षद साठे यांनी कोर्टाकडे आपली बाजू मांडल्या नंतर सरकारी वकिलांनी आपली बाजू मांडली या दोघांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दरम्यान संतोष परब हल्याप्रकरणी सचिन सातपुते याला पोलिसांनी दिल्लीतून अटक केली होती. त्यानंतर सातपुते चे सीडीआर रिपोर्ट जिल्हा न्यायालयात सरकारी वकिलांकडून सादर करण्यात आले होते. आज झालेल्या सुनावणीत आरोपीला न्यायालयीन कोठडी मिळाली असून आरोपिकडून अँड हर्षद साठे यांनी काम पाहिले. दरम्यान आमदार नितेश राणे यांच्याशी सचिन सातपुते यांचा संपर्क असल्याचा दावा सरकारी वकिलांकडून जिल्हा न्यायालयात करण्यात आला होता.यामुळे आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सात जानेवारी रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती देखील मिळत आहे.
