Headlines

वेंगुर्ला तालुका ठाकरे शिवसेना पक्षाची आढावा बैठक संपन्न….

पक्षाची रिक्त पदे भरण्यासह संघटना वाढीकडे लक्ष पुरवा ; प्रदिप बोरकर

वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुका ठाकरे शिवसेना पक्षाची आढावा बैठक सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा संपर्कप्रमुख प्रदीप बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली ठाकरे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात संपन्न झाली. यावेळी पक्षाची तालुक्यातील रिक्त असलेल्या पदाबाबत चर्चा संपन्न झाली. सद्यस्थितीत व पुढील कालावधीत रिक्त पदे भरण्याच्या सूचना प्रदीप बोरकर यांनी तालुकाप्रमुखांना केल्या. तसेच आगामी कालावधीत होणाऱ्या निवडणुकांच्या अनुषंगाने वेंगुर्ला तालुक्यात पुन्हा एकदा ठाकरे शिवसेना पक्षाने मुसंडी घेण्याच्या दृष्टीने सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे त्यांनी सुचित केले. यावेळी तालुकाप्रमुख निलेश चमणकर, उपतालुकाप्रमुख सुमन कामत, विधानसभा संघटिका सुकन्या नरसुले,
उभादांडा जि. प. सदस्य तथा उपजिल्हाप्रमुख संजय गावडे, उपजिल्हाप्रमुख प्रकाश गडेकर, आडेली जि. प. सदस्य विजय नाईक, शहरप्रमुख शैलेश परुळेकर, महिला तालुकाप्रमुख साक्षी चमणकर, उभादांडा विभाग प्रमुख सुजित चमणकर, शहर शाखाप्रमुख सचिन मांजरेकर, युवा सेना तालुकाप्रमुख श्री.म्हापणकर, दिलीप राणे, उभादांडा उपशहरप्रमुख अभिमन्यू भुते, देवा जुवलेकर, ओंकार पंडित, उभादांडा महिला विभागप्रमुख पेडणेकर, युवासेना पदाधिकारी वैभव फटजी, सुधाकर राणे, डेलीन डिसोजा, तुळस उपशाखाप्रमुख समीर शेटकर आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page