मठ कार्यक्षेत्रातील दुसऱ्या साईडपट्टी भरावाचे काम करण्यात यावे

वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यातील मठ ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील मठ शिवाजी चौक ते अंतर्गत जाणाऱ्या रस्ता नजीक गटाराचे काम सुरू करण्यात आल्याने मठ ग्रामपंचायत सरपंच रूपाली नाईक यांच्या कार्यपद्धतीबाबत वाहनधारकातून समाधान व्यक्त करण्यात आले आहे. मुख्य मार्गानजीक अंतर्गत वाड्यांमध्ये जाणारा हा महत्त्वाचा मार्ग असून उर्वरित भागातही गटारांचे काम होणे आवश्यक आहे. दरम्यान मागील कालावधीत येथील गटार बाबत मठ माजी उपसरपंच निलेश नाईक, तसेच शिवसेना पदाधिकारी प्रशांत नाईक यांनी शासनाचे लक्ष वेधले होते. मागील कालावधीत सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब यांच्या प्रयत्नातून मठ गावात विविध ठिकाणी विकासकामे मार्गी लागली असून समाधान व्यक्त होत आहे. भाजपाचे पदाधिकारी अजित नाईक यांनीही स्वतः लक्ष घालून मुख्य मार्ग साईडपट्टी भरावाचे काम चांगल्या दर्जाचे झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान नागरिकांनी मागणी केल्यानंतर वेंगुर्ला सावंतवाडी मठ कार्यक्षेत्रातील उर्वरित दुसऱ्या साईडपट्टी भरावाचे काम करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. मठ कार्यक्षेत्रात रस्ता दुतर्फा वाढलेले गवत त्वरित कटिंग करण्यात यावे, अशी मागणी असून ग्रामपंचायत मार्फत मुख्य मार्गावरील स्ट्रीटलाईट पुरवठा सुरळीत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान मठ गावात व्होडाफोन कंपनीची सुविधा सुरु झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. मठ हायस्कुलनजिक मुख्य मार्गानजिक वाढलेली झाडी कटिंग कडे दुर्लक्ष झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
