Headlines

पेंडूर-सातवायंगणीत दीपावली शो टाईम स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

सावंतवाडी : ॐकार युवक कला क्रीडा मंडळ व ग्रामस्थ पेंडूर-सातवायंगणी यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे दीपावली शो टाईम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सातवायंगणी येथील श्री देव ब्राह्मण स्थळानजीक या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध मनोरंजनात्मक , स्पर्धात्मक कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना अनुभवता आली.

यात श्री मोरेश्वर दशावतार नाट्यमंडळ, मोरे (ता. कुडाळ) यांचा ‘पराशक्ती धुमावती’ हा दशावतार नाट्यप्रयोग प्रेक्षकांच्या मोठ्या उपस्थितीत संपन्न झाला.
तसेच गाव मर्यादित आणि खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचे उद्घाटन प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर पेंडूर गावचे सामाजिक कार्यकर्ते देवा कांबळी, उद्योजक शामसुंदर शिरोडकर, ग्रामपंचायत सदस्य रंजना वैद्य, भाऊ आजगावकर, तुळशीदास पाटकर, परीक्षक महेंद्र मातोंडकर,स्नेहल जांभोरे तसेच अशोक वैद्य, मेघश्याम वैद्य, डॉ.अक्षय माडकर,पत्रकार मदन मुरकर,नंदकुमार भगत,भरत गावडे मधुकर हर्जी,अरुणकुमार गवंडकर,संपत नर्से ,मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मंडळाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत राजेश शिरोडकर यांच्या हस्ते सुपारी रोप व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.

स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे असून (खुली स्लो मोटरसायकल स्पर्धा )विजेता तुषार वैद्य उपविजेता महेश वैद्य, (डोळे झाकून नारळ फोडणे )विजेता समीर वैद्य, (संगीत खुर्ची) विजेता रेशम वैद्य उपविजेता स्वप्नाली नर्से, संगीत खुर्ची) विजेता सिया वैद्य उपविजेता स्नेहा वैद्य,गाव मर्यादित रांगोळी स्पर्धा मोठा गट) प्रथम – सेजल वैद्य द्वितीय – आचल वैद्य ,तृतीय – निलेश वैद्य (रांगोळी स्पर्धा लहान गट) प्रथम – श्रुती वैद्य ,द्वितीय श्रावी वैद्य, तृतीय – मयंक वैद्य, स्लो सायकल स्पर्धा) प्रथम – महेश वैद्य, द्वितीय – नवल शिरोडकर,(संगीत खुर्ची पुरुष) प्रथम- नवल शिरोडकर ,द्वितीय – पवन वैद्य ,संगीत खुर्ची )प्रथम – सोहम वैद्य ,द्वितीय- काव्या हर्जी,आकाश कंदील स्पर्धा मर्यादित ) प्रथम – धनेश हर्जी ,द्वितीय – आचल वैद्य ,तृतीय- पवन वैद्य, (दीपावली शो टाईम स्पर्धा खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा मोठा गट) प्रथम – घनश्याम सोनवणे मुंबई, द्वितीय – शुभम रसाळ रत्नागिरी तृतीय – दित्या शिरवलकर, (लहान गट) प्रथम – श्रेष्ठा फडते, द्वितीय – दृश्यम परब, तृतीय – आराध्या कोठावळे ,इन्सुली यांना मिळाला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुप शिरोडकर तर आभार निलेश वैद्य यांनी मानले.

You cannot copy content of this page