Headlines

महायुती सरकारामुळे लोककलांना मिळाला राजाश्रय…

आम. प्रमोद जठार: कणकवलीत दिवाळी ईली, फराळाक यावा रंगला कार्यक्रम..

⚡कणकवली ता.२८-: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकाराच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पारंपरिक लोककला आणि कलाकारांना खऱ्या अर्थाने राजाश्रय देण्याचे काम होत आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या माध्यमातून लोककलेच्या संवर्धनासाठी आणि कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. कोकणची ओळख असलेल्या दशावतारासारख्या लोककलांना प्रोत्साहन मिळणे ही अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन आमदार प्रमोद जठार यांनी केले.
सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने देवदिवाळीनिमित्त येथील आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यमंदिरात ङ्गदिवाळी ईली फराळाक येवाफ हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला आम. जठार यांनी उपस्थित लावली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर,अभिनेते दिगंबर नाईक    सेवानिवृत्त गटविकास अधिकारी विजय चव्हाण, पत्रकार रजनीश राणे, संजय राणे, हरिभाऊ भिसे आदी मान्यवर उपस्थित होते. आम. प्रमोद जठार यांनी कलाकारांचे कौतुक केले.
चौकट
राजाश्रय मिळण्यासाठी पारकरांनी योग्य निर्णय घ्यावा
संदेश पारकर हे आपले मित्र असून कणकवलीचे नगराध्यक्ष आहे. कणकवलीतील स्थानिक कालकारांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने जानेवारी महिन्यात न. पं. च्या माध्यमातून कणकवली पर्यटन महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवासाठी लागणारे सहकार्य आपण करणार आहोत. संदेश पारकर यांना राजकीयदृष्टया राजाश्रय मिळण्यासाठी त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा, अशी कोपरखळी आम. जठार यांनी मारली.
चौकट
कोकणच्या लोकसंस्कृतीचे घडले दर्शन
दिवाळी ईली, फराळाक या कार्यक्रमात तळकोकणातील समृद्ध लोककला आणि सांस्कृतिक परंपरेचा देखणा आविष्कार प्रेक्षकांना अनुभवायला मिळाला. कोकणच्या मातीत रुजलेली आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घालणारी दशावतार लोककला विशेष आकर्षण ठरले. 30 कलाकारांच्या सहभागातून कोकणची शान असलेल्या दिवाळीतील पारंपरिक कलाविष्कारांचे सादरीकरण करण्यात आले. कलाकारांनी अभिनयातून, संवादातून, कलाविष्कारातून रसिकांची मने जिंकली. कलाविष्कारांमुळे कोकणच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडले. सूत्रसंचालन अभिनेते दिगंबर नाईक आणि श्रुती परब यांनी आपल्या खास मालवणी शैलीत केले. त्यांच्या निवेदनामुळे कार्यक्रमाला रंगत आली. या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे प्रेक्षकांना कोकणच्या लोककलेचा आणि परंपरेचा जागर अनुभवायला मिळाला.
फोटो

You cannot copy content of this page