Headlines

पियाळी नदीत सिलिका वॉशिंगचे गढूळ पाणी

जन आंदोलन उभारणार;असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांचा इशारा *⚡कणकवली ता.०४-:* कणकवली तालुक्यातील असलदे-पियाळी नदीचे पाणी पुन्हा एकदा गढूळ झाल्याने बऱ्याच गावांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. सिलिका वाशिंग केलेले पाणी नदीत सोडले जात आहे, त्याला जबाबदार कोण? त्यांच्यावर तातडीने कारवाई करा, अशी मागणी करुनही प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. याबाबत वारंवार आवाज उठविला आहे तरीही सबधितांवर…

Read More

राजन तेली यांचा राजीनामा अखेर नामंजूर

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिल्या शुभेच्छा *⚡कणकवली ता.०४-:* भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी राजन तेली हेच यापुढेही कार्यरत राहणार आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पराभवा नंतर तात्काळ श्री तेली यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठविलेला राजीनामा नामंजूर करण्यात आला आहे. श्री. पाटील यांनी राजन तेली यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपले दि. ३१ डिसेंबर २०२१…

Read More

महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ मालवण शाखेचे कांदळगावात स्नेहसंमेलन संपन्न

*⚡मालवण ता.०४-: महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ सिंधुदुर्ग शाखा मालवणचा स्नेह मेळावा कांदळगाव येथील श्री संजय गोपाळ मराठे यांच्या निवासस्थानी श्री आशिष आपटे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाला. संमेलनाची सुरुवात श्री गणेश पूजन , श्री परशुराम महाराज मूर्ती पूजन, गो पूजन विधीने झाली. संमेलनाचे यजमानपद सौ व श्री आनंद पटवर्धन तसेच पौरोहित्य श्री गणेश नातू यांनी सांभाळले….

Read More

चिंदर पालकरवाडी शाळेतील विद्यार्थिनी कु. दुर्गा श्रीपाद म्हापसेकर हिची नवोदय विद्यालयसाठी निवड

*⚡मालवण ता.०४-: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंदर पालकरवाडी, ता-मालवण शाळेची विद्यार्थिनी दुर्गा श्रीपाद म्हापसेकर हिने जवाहर नवोदय परीक्षा २०२१ मध्ये उज्वल यश संपादन केले असून नवोदय साठी तिची निवड झाली आहे. दुर्गा हिने वर्गशिक्षक श्री शिवानंद सोलापुरे व श्री नंदकुमार जुंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेचा कसून सराव केला. तिच्या या यशाबद्दल मालवण तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री संजय…

Read More

चिंदर येथील(मुंबईस्थीत) सुभाष तावडे यांचे निधन

*⚡मालवण ता.०४-:* चिंदर गावठवाडी येथील मुंबईस्थीत सुभाष विष्णू तावडे यांच काल निधन झाल. ते ६६ वर्षांचे होते. “विजय क्रिडा मंडळ भांडूप” सारख्या तळागाळा पर्यंत सामाजिक पणा जपणा-या संघटनानशी ते सक्रिय होते. “भाऊ” या नावाने प्रसिद्ध असणारे तावडे दानशुर पणा बद्दल विख्खात होते. गावातील अनेक तरुणांना मुंबईत रोजगार प्राप्त करुन देण्यासाठी ते प्रयत्न करत असत. त्यांच्या…

Read More

कोविड काळजी केंद्रे सक्रीय करण्यासाठीची तयारी करावी

आरटीपीसीआर चाचण्या वाढवण्याबरोबरच 100 टक्के लसीकरणासाठी सक्रीय व्हा-:जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी *⚡सिंधुदुर्गनगरी ता.०४-: वाढत्या रुग्ण संख्येच्या अनुषंगाने जिल्ह्यातील कोविड काळजी केंद्रे सक्रीय करण्यासाठी तयारी करावी. आवश्यक ती साधनसामग्री, वैद्यकीय सुविधा, औषधे, ऑक्सिजनचा साठा याबाबत नियोजन करा. नगर परिषदेचे मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, गट विकास अधिकारी यांनी पहिला डोस 100 टक्के होण्याच्या दृष्टीकोनातून सक्रीय व्हावे. त्याचबरोबर…

Read More

महिला सक्षमीकरणाची सुरुवात घराघरातून व्हावी

प्रा. रुपेश पाटील यांचे प्रतिपादन;सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त फेसबुक पेजवर ऑनलाईन व्याख्यान *⚡सावंतवाडी ता.०४-: आजच्या एकविसाव्या शतकात महिलांनी वैयक्तिक प्रगतीची गरुड झेप घेतली आहे. महिला अनेक बाबतीत स्वयंभू झाल्या असून यामागे सावित्रीबाई फुले यांचा प्रचंड त्याग आणि बलिदानाचे योगदान आहे. हा त्याग समजून घेत महिला सक्षमीकरणासाठी प्रत्येक घरातून सुरुवात व्हायला हवी, असे मत प्रा. रुपेश पाटील…

Read More

मळगाव माता रमाबाई आंबेडकर नगरात सावित्रीबाई फुले जयंती साजरी…

*⚡सावंतवाडी ता.०४-:* मळगाव येथील माता रमाबाई आंबेडकर नगर येथे काल महिला शिक्षणासाठी लढा देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची जयंती जयभीम तरुण विकास मंडळ आणि महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली आहे. यावेळी त्या भागातील सर्व महिला, मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Read More

युवा सेना जिल्हाधिकारीपदी सुशांत नाईक यांची नियुक्ती

*⚡कणकवली ता.०४-:* शिवसेना पक्षप्रमुख , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते , युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.यामध्ये नवनिर्वाचित जिल्हा बँकेचे संचालक नगरसेवक सुशांत नाईक यांची जिल्हा युवा अधिकारी कणकवली विधानसभा पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. यामध्ये निवड झलेल्या…

Read More

पंचशील क्रिकेट क्लब खारेपाटणतर्फे अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

*⚡कणकवली ता.०४-: पंचशील विकास मंडळ खारेपाटण पुरस्कृत व पंचशील क्रिकेट क्लब खारेपाटण आयोजित मर्यादित षटकांच्या भव्य अंडर आर्म खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन ५ जानेवारी २०२२ पासून खारेपाटण येथील केदारेश्वर मैदानावर करण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष संतोष पाटणकर यांनी दिली. या स्पर्धेकरिता अंतिम विजेता संघाला रोख रुपये १०,०२२ /- व आकर्षक चषक तर…

Read More
You cannot copy content of this page