चिंदर पालकरवाडी शाळेतील विद्यार्थिनी कु. दुर्गा श्रीपाद म्हापसेकर हिची नवोदय विद्यालयसाठी निवड

*⚡मालवण ता.०४-: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंदर पालकरवाडी, ता-मालवण शाळेची विद्यार्थिनी दुर्गा श्रीपाद म्हापसेकर हिने जवाहर नवोदय परीक्षा २०२१ मध्ये उज्वल यश संपादन केले असून नवोदय साठी तिची निवड झाली आहे. दुर्गा हिने वर्गशिक्षक श्री शिवानंद सोलापुरे व श्री नंदकुमार जुंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेचा कसून सराव केला.

तिच्या या यशाबद्दल मालवण तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री संजय माने विस्ताराधिकारी .उदय दिक्षित, केंद्रप्रमुख प्रसाद चिंदरकर, सरपंच सौ. राजश्री कोदे, उपसरपंच दिपक सुर्वै, ग्राम पंचायत सदस्य सौ.स्वरा पालकर, शाळा व्यव. स. अध्यक्ष सौ.दिक्षा पालकर, शिक्षण प्रेमी रविंद्र लब्दे, शेखर पालकर, सौ.मनवा मिलिंद चिंदरकर व चिंदर ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page