Headlines

देवगडात १६ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी १३ अर्ज

*⚡देवगड ता.०३-: देवगड तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीच्या १८ जागांकरिता फक्त १३ नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत. या पोटनिवडणूक होणाऱ्या ग्रा.प.मध्ये मणचे,टेंबवली, कट्टा,पाटगाव,वाघोटण, हडपीड,कुवळे, आरे, चांदोशी,हिंदळे, महाळुंगे,गिर्ये, चाफेड,वाघिवरे-वेळगीवे, पाळेकरवाडी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या पैकी टेंबवली ग्रा.प.१जागेकरिता ४अर्ज,वाघोटण १जागा १अर्ज,महाळुंगे २ जागा २अर्ज,चाफेड १जागा १अर्ज,वाघिवरे-वेळगीवे १जागा १अर्ज ,पाळेकरवाडी१जागा ३अर्ज दाखल झाले आहेत.

Read More

शेती या उद्योगाशी निगडीत व्यवसायांना कोकणातील तरुणांनी प्राधान्य द्यावे

मळगाव येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात शेती तज्ञ व कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनपर प्रतिपादन *⚡सावंतवाडी ता.०३-:* मागील दोन वर्षात कोविड-१९ या रोगामुळे लागलेल्या लाॅकडाऊनच्या काळात देशातील सर्व उद्योग -व्यवसाय बंद पडले होते. केवळ शेती हा उद्योग देशात सुरु होता. त्यामुळे शेती हाच उद्योग व या उद्योगाशी निगडीत व्यवसाय यांना कोकणातील तरुणांनी प्राधान्य देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन…

Read More

छोट्या उद्योजकांना व्यवसायिकांना कर्ज मिळवण्याच्या दृष्टीने शासन स्तरावर पाठपुरावा करणार…

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड चालू एग्रीकल्चर अध्यक्ष ललित गांधी यांचे आश्वासन… मालवण (प्रतिनिधी) महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर चे अध्यक्ष सन्माननीय श्री ललित गांधी यांची अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गव्हर्निंग कौन्सिल मेंबर श्री. चंद्रशेखर पुनाळेकर, श्री. महेश मांजरेकर श्री. भालचंद्र राऊत यांनी सदिच्छा भेट घेतली. जिल्ह्यामध्ये व्यवसाय, उद्योग,…

Read More

कणकवली तालुका पत्रकार समितीचे विविध पुरस्कार जाहीर

*⚡कणकवली ता.०३-:* कणकवली तालुका पत्रकार समितीच्यावतीने देण्यात येणारे पत्रकारीता , उद्योजक व सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार जाहिर करण्यात आले आहेत . यात बाळशास्त्री जांभेकर स्मृती ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार आनंद अंधारी , शशी तायशेटे स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार सुधीर राणे यांना तर अनिल सावंत स्मृती ग्रामिण पत्रकार पुरस्कार ऋषीकेश मोरजकर यांना जाहिर करण्यात आला . यशस्वी उद्योजक…

Read More

देवगड जामसंडे न.प.निवडणूक ४जागाकरिता १३ उमेदवारी अर्ज दाखल

भाजप आणि महाविकास आघाडीचे शक्तिप्रदर्शन *⚡देवगड ता.०३-:* देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या १८ जानेवारी रोजी होणाऱ्या उर्वरित ४ प्रभागांमधून एकूण १३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.उमेदवारी दाखल करण्यासाठी भारतीय जनता पार्टी तसेच महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शक्ती प्रदर्शन करीत भाजप च्या वतीने चार प्रभागात उमेदवारी अर्ज दाखल केले तर महाविकास आघाडीतील शिवसेनेचे वतीने तीन प्रभागात उमेदवारी अर्ज दाखल…

Read More

मालवणच्या भंडारी हायस्कुलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी

*⚡मालवण ता.०३-:* मालवण येथील भंडारी ए सो हायस्कुलमध्ये स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस प्रशालेच्या जेष्ठ शिक्षिका सौ प्राची प्रभू यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात केले. यावेळी पर्यवेक्षक एच बी तिवले , त्याच प्रमाणे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विध्यार्थी उपस्थित होते.

Read More

सिंधुदुर्ग महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

*⚡मालवण ता.०३-:* मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय आणि रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा.के के राबते.यांनी सूत्रसंचालन केले. तर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला सामंत यांनी मनोगत व्यक्त करत सावित्रीबाईंच्या कार्याचा आढावा घेतला. आभार प्रदर्शन प्रा….

Read More

भजनसंगीत चळवळ कायम चालू राहावी – अजिंक्य पाताडे

*⚡मालवण ता.०३-:* दरवर्षी वर्षाच्या सुरुवातीलाच भजन कला जोपासण्यासाठी स्वरांजली अभंगगाथा हा संगीतमय कार्यक्रम राबविणे हा स्तुत्य उपक्रम असून ही भजनसंगीत चळवळ कायम चालू रहावी, असे प्रतिपादन मालवण पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे यांनी करंजे येथे केले. संत रोहिदास प्रासादीक भजन मंडळ करंजे व बुवा गजानन करंजेकर आयोजित स्वरांजली अभंगगाथा कार्यक्रम करंजे ता. कणकवली येथे पार…

Read More

ओझर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी अनुभवले आकाशातील ग्रह-तारे

*⚡मालवण ता.०३-:* कांदळगाव येथील ओझर विद्यामंदिर या प्रशालेच्या मैदानामध्ये विद्यार्थी व शिक्षकांसाठी मालवण येथील खगोल तज्ज्ञ मंदार माईणकर यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्बिणीद्वारे आकाश दर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ओझर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांना आकाशातील ग्रह – तारे दुर्बिणीद्वारे अनुभवता आले. तसेच विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन दृढ होण्यास मदत झाली. मालवणमधील खगोलशास्त्राचे अभ्यासक मंदार माईणकर यांनी सुरुवातीला विद्यार्थ्यांना दुर्बिणीद्वारे अवकाशातील…

Read More

वैभववाडी दत्त विद्यामंदिरात बालिकादिन साजरा…

वैभववाडी प्रतिनिधी शाळा दत्त विद्यामंदिर वैभववाडी नंबर 1मध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती म्हणजेच “बालिकादिन” साजरा करण्यात आला.या दिनाप्रीत्यर्थ सावित्रीबाई फुलेंच्या वेशभूषा सादर करण्यात आली. शाळेत आज विद्यार्थ्यानी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा घेणारी भाषणे केली. सावित्रीबाई फुलेंच्या जयंती कार्यक्रमाला सामाजिक केंद्र प्रमुख जाधव सर ,सौ दिप्ती पाटील मॅडम,सौ सावंत मॅडम,सौ सरकटे मॅडम, पारधे सर ,…

Read More
You cannot copy content of this page