*⚡कणकवली ता.०३-:* कणकवली तालुका पत्रकार समितीच्यावतीने देण्यात येणारे पत्रकारीता , उद्योजक व सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार जाहिर करण्यात आले आहेत . यात बाळशास्त्री जांभेकर स्मृती ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार आनंद अंधारी , शशी तायशेटे स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार सुधीर राणे यांना तर अनिल सावंत स्मृती ग्रामिण पत्रकार पुरस्कार ऋषीकेश मोरजकर यांना जाहिर करण्यात आला . यशस्वी उद्योजक पुरस्कारासाठी ज्येष्ठ उद्योजक रघु नाईक व विल्बर्ट प्रॉपर्टीजचे विल्सन पिंटो तर सामाजिक कार्यकर्ता पुरस्कारासाठी हेल्प अॅकॅडमी फोंडाघाटचे संजय नेरूरकर यांची निवड करण्यात आली .
तालुका पत्रकार समितीच्या कार्यकारिणीची बैठक तालुकाध्यक्ष चंद्रशेखर देसाई यांच्या अध्यक्षतेखाली तेलीआळी येथील भवानी सभागृहात झाली . यावेळी तालुका सचिव संजय राणे , खजिनदार नितीन कदम , उपाध्यक्ष उत्तम सावंत , स मिलींद डोंगरे , सदस्य तुळशिदास कुडतरकर , भास्कर रासम , रंजिता तहसीलदार , गुरूप्रसाद सावंत , रमेश जामसांडेकर , हेमंत वारंग यांच्या उपस्थितीत झाली . यावेळी तालुका पत्रकार समितीकडून देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली . सर्व पुरस्कारप्राप्त पत्रकारांना रोख रक्कम , स्मृतिचिन्ह , प्रमाणपत्र तसेच यशस्वी उद्योजक , सामाजिक कार्यकर्ता यांना स्मृतिचिन्ह , मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे .
यशस्वी उद्योजक पुरस्कारासाठी ज्येष्ठ उद्योजक रघु नाईक व विल्बर्ट प्रापॅर्टीजचे विल्सन पिंटो व दिनेश कुंभार यांचीही यशस्वी उद्योजक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली . तसेच तालुका पत्रकार समितीला नेहमीच सहकार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर उपरकर यांचाही विशेष सन्मान करण्याचे निश्चित करण्यात आले . पुरस्कार वितरणची तारीख व ठिकाण लवकरच जाहिर करण्यात येणार असल्याचे तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर देसाई , सचिव संजय राणे व खजिनदार नितीन कदम यांनी सांगितले . यावेळी असलदे सोसायटीच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल भगवान लोके यांचा तर जिल्हा पत्रकार संघाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल नितीन कदम यांचा सत्कार करण्यात आला