संजू परब: संघटना अधिक बळकट करण्यासाठी मी आणखीन प्रयत्न करणार..
⚡सावंतवाडी ता.१४-: सावंतवाडी मतदारसंघात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मिळालेले यश हे सर्व आमदार दीपक केसरकर यांच्या विकास कामांमुळेच असे प्रतिपादन जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केले. एवढ्या धनशक्तीसमोर आपले सदस्य निवडून आले, यातून संघटना मजबूत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले, असेही त्यांनी नमूद केले. ते नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या सत्कार प्रसंगी बोलत होते.
परब म्हणाले, “आज मिळालेले यश हे पूर्णपणे संघटनेच्या जोरावर आहे. काही उमेदवार किरकोळ मतांनी पराभूत झाले असले तरी त्याचे आत्मपरीक्षण केले जाईल. येणाऱ्या काळात संघटना अधिक बळकट करण्यासाठी मी सर्वोत्तम प्रयत्न करणार आहे. प्रचंड धनशक्तीच्या पुढे तुम्ही निवडून आलात, त्याबद्दल तुमचे मनापासून कौतुक करतो.”
“हे सर्व केसरकर यांच्या आशीर्वादामुळे शक्य झाले. संघटना आणि तुम्हाला काम करण्यासाठी जी काही मदत लागेल ती मी आणि केसरकर नक्कीच करू,” असा विश्वासही परब यांनी व्यक्त केला.
