आमदार दीपक केसरकर: तर सचिन वालावलकर यांचा राजीनामा आम्ही स्वीकारलेला नाही..
सावंतवाडी, ता.१४ : मतदारसंघात निवडून आलेल्या अपक्ष उमेदवारांबाबत काय निर्णय घ्यायचा, याचा अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
निवडणुकीदरम्यान पैशांचे गैरप्रकार झाल्याचे समोर आले. हे प्रकार मला अजिबात मान्य नसल्यामुळे मी प्रचारात फारसा सक्रिय राहू शकलो नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी त्यांनी खासदार नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच पालकमंत्री नितेश राणे यांचे मनापासून आभार मानले. महायुती घडवून आणण्यासाठी नारायण राणे यांनी पुढाकार घेतल्यानेच हे घवघवीत यश मिळाले, असेही ते म्हणाले.
पराभूत उमेदवारांचीही लवकरच भेट घेणार असून त्यांनी कुठलाही गैरसमज न बाळगता संघटना वाढीसाठी पुढेही काम करत राहावे, असे आवाहन केसरकर यांनी केले.
अपक्ष उमेदवारांचा ‘किंगमेकर’ कोण, या प्रश्नावर मात्र त्यांनी भाष्य टाळत ‘नो कमेंट्स’ असे उत्तर दिले.तर सचिन वालावलकर यांनी राजीनामा दिला तरी तो आम्ही स्वीकारलेला नाही असं देखील केसरकर यांनी स्पष्ट केले.
