⚡वैभववाडी ता.१६-: वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या वतीने नगरपंचायतीच्या हद्दीतील कोंडवाडी येथे नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे यांच्या उपस्थितीत. सुख नदीला वनराई बंधारा बांधण्यात आला.
पालकमंत्री ना नितेश राणे, व जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या सूचनेनुसार वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या हद्दीतील कोडवाडी येथील सुख नदीला वनराई बंधारा बांधण्यात आला या बंधाऱ्यात साठलेले पाणी वैभववाडी शहरासह कोंडवाडीसाठी उपयोगात येणार आहे वाभवे वैभववाडी नगरपंचायतीची नळ योजनेची विहीर याच नदीला लागून असल्याने या सुख नदीवरील बंधाऱ्यांचा उपयोग या विहिरीला होणार आहे त्यामुळे नगरपंचायतीने कोडवाडी येथील सुख नदीवर वनराई बंधारा बांधण्यात आला.
यावेळी नगराध्यक्षा सौ.श्रद्धा रावराणे, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक संजय सावंत,शहर अध्यक्ष भाजपा शिवाजी राणे, आदी ग्रामस्त उपस्थित होते .

