Headlines

मालवणात हॉटेल कामगार तरुणाची आत्महत्या

मालवण (प्रतिनिधी)

मालवण येथील एका हॉटेलमध्ये कामावर असलेल्या गणेश विजय कदम (वय ३३, रा. कांदळगाव बौद्धवाडी, ता. मालवण) या तरुणाचा हॉटेल मधील एका रूममध्ये बेड रनरच्या कापडच्या साहाय्याने फॅनला आज सकाळी गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला असून याबाबत मालवण पोलिसात खबर देण्यात आली आहे पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कांदळगाव येथील गणेश कदम हा तरुण मालवण मधील एका हॉटेल मध्ये वर्षभरापासून कामास होता. काल रविवारी रात्री दीड वाजेपर्यंत त्याने पाणी भरण्याचे काम केले. त्यानंतर आज सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान हॉटेल मालकास एका हॉटेल रूम मध्ये गणेश कदम याचा गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला. रूम मधील बेड रनरच्या कापडच्या साहाय्याने फॅनला गणेश याने गळफास घेतलेला होता तसेच रूम मधील एसी सुरु होता तसेच रूमचा दरवाजा उघडा होता.

याबाबत मालवण पोलीसांना माहिती देण्यात आल्यावर मालवणचे डीवायएसपी दीपक शेलार, पीएसआय भगत, पोलीस हवालदार जनार्दन रेवंडकर व जितेंद्र पेडणेकर यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी करत पंचनामा केला. त्यानंतर गणेश याचा मृतदेह मालवण ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता.

गणेश याला नृत्याची आवड होती. गणेश इंस्टाग्रामवर आपल्या नृत्याचे व्हिडीओ देखील बनवायचा. गणेश कदम याने आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट झालेले नाही. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. गणेश याच्या पश्चात आई, बहीण असा परिवार आहे.

You cannot copy content of this page