Headlines

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीची मंगळवारी ओरोस येथे महत्त्वाची बैठक…

मालवण, दि प्रतिनिधी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीची महत्त्वाची आढावा बैठक उद्या १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता ओरोस येथील जिल्हा बँकेशेजारील शिक्षक पतपेढी हॉलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत जिल्ह्यातील काँग्रेस कार्याचा आढावा, स्थानिक पातळीवरील पक्ष संघटन बळकटीकरण तसेच ‘व्होट चोरी’च्या गंभीर मुद्द्यावर सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी दिली आहे.
या बैठकीस वरिष्ठ प्रभारी नेते उपस्थित राहून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा प्रभारी व प्रदेश सरचिटणीस शशांक बावचकर, सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी व प्रदेश सरचिटणीस माजी आमदार हुस्नबानो खलिपे, कुडाळ विधानसभा प्रभारी गौस खतीब आणि सावंतवाडी विधानसभा प्रभारी अश्विनी आगाशे यांचा समावेश आहे.

या बैठकीस जिल्ह्यातील आजी-माजी आमदार, लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील उमेदवार, प्रदेश पदाधिकारी, प्रांतिक सदस्य, जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी तसेच महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयुआय, सेवादल, ओबीसी, अल्पसंख्यांक, अनुसूचित जाती/जमाती, आयएनटीयुसी, पर्यावरण, विचार विभाग व इतर यांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

तसेच सर्व तालुकाध्यक्ष व कार्यकारिणी पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page