Headlines

बक्षिसाच्या रक्कमेतून आश्रमाला मदत…

⚡वेंगुर्ला ता.१७-: वेंगुर्ला शहरातील जबरदस्त सांस्कृतिक कला-क्रीडा मंडळाने आपल्याला मिळालेल्या नरकासूर स्पर्धेच्या पारितोषिकाच्या रक्कमेतून जीवनावश्यक वस्तू खरेदी करीत त्या पणदूर येथील संविता आश्रमाला प्रदान केल्या. या स्तुत्य उपक्रमाबद्दल मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जबरदस्त मित्रमंडळाने बनविलेल्या नरकासूराच्या प्रतिमेला यावर्षी प्रथम क्रमांकाचे बक्षिस मिळाले. मिळालेल्या बक्षिसाच्या रक्कमेतून पणदूर येथील संविता आश्रमाला जीवनावश्यक वस्तू प्रदान केल्या. यावेळी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, गेल्यावर्षी सुद्धा या मंडळाच्या नरकासूराला द्वितीय क्रमांकाचे बक्षिस मिळाले होते. त्या रक्कमेतून पिंगुळी येथील जिव्हाळा सेवाश्रम माड¬ाचीवाडी येथे जीवनावश्यक वस्तू प्रदान केल्या होत्या.
फोटोओळी – संविता आश्रमाला जीवनावश्यक वस्तू प्रदान करताना जबरदस्त मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page