Headlines

उंबर्डे आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरण्यासह आरोग्य सुविधांचे प्रश्न मार्गी लावा…

जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावरणे यांची पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे विविध निवेदनांद्वारे मागणी..

⚡वैभववाडी ता.१६-: तालुक्यातील उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमधील आरोग्य सुविधांशी संबंधित विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावरणे यांनी पालकमंत्री नितेश राणे यांना विविध निवेदने दिली आहेत. रिक्त पदे भरणे, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बदलायची अंमलबजावणी, प्रतिनियुक्ति रद्द करणे, आशा स्वयंसेविकेचे स्वतंत्र पद मंजूर करणे आणि नवीन उपकेंद्राची इमारत बांधणे, अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत.
​उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांचे पदे रिक्त आहेत. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना नियमित आरोग्य सेवा मिळण्यात अडचणी येत आहे. रिक्त पदांमुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत असून आरोग्य विषयक योजनांची अंमलबजावणी आणि जनजागृतीवरही परिणाम होत आहे. ही पदे तातडीने भरण्याची मागणी रावरणे यांनी केली आहे.
​उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आरोग्य सेवक रमेश खेमा राठोड यांची कुसूर उपकेंद्रात प्रशासकीय बदली करण्यात आली आहे. मात्र, बदलीचे आदेश होऊनही त्यांना अद्याप कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. कुसूर येथील आयुष्मान आरोग्य मंदिरात नियमित आरोग्य सेविका व कंत्राटी आरोग्य सेविका ही दोन्ही पदे रिक्त असल्याने राठोड यांना बदलीच्या ठिकाणी तातडीने कार्यमुक्त करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
​तसेच तिथवली आणि दिगशी या दोन गावांसाठी एकच आशा स्वयंसेविका पद मंजूर आहे. गावामधील अंतर आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता दिगशी गावासाठी स्वतंत्र आशा स्वयंसेविका पद मंजूर करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page