अभिनय बेर्डे:अभिनय बेर्डे यांच्याकडून हिंदू वैश्यवाणी युवा संघटनेचा शुभारंभ,दीपक केसरकर, राजन तेली यांची उपस्थिती..
सावंतवाडी : माझे वडील अभिनेते कै. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी संपूर्ण सिनेसृष्टीला व्यवसाय कसा करायचा ? हे शिकवलं. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ त्यांना पक्का वाणी म्हणायचे. वडीलांवर हा संस्कार आपल्या समाजानं केला असं मत अभिनेता अभिनय बेर्डे यांनी व्यक्त केले. तसेच मराठी माणसाला व्यवसाय कळत नाही असं म्हटलं जातं. मात्र, ते आपल्या बांधवांना भेटले नाहीत. व्यवसाय, उद्योगात आपली युवा मंडळी येऊन मराठी माणूस व्यवसायात आणखीन मोठा होताना दिसावा अशी भावना त्यांनी व्यक्त केली. सावंतवाडी येथील आयोजित हिंदू वैश्यवाणी युवा संघटना स्थापनेच्या निमित्ताने आयोजित शुभारंभ सोहळ्यात ते बोलत होते.
अभिनेते श्री. बेर्डे म्हणाले, समाजाचा पहिलाच मोठा कार्यक्रम आज पाहता आला. मुंबई सारख्या ठिकाणी वैश्य समाज कुठे एकत्रित दिसला नाही असे कार्यक्रम तिथे होत नाही. परंतु, आज सिंधुदुर्गात ते बघायला मिळालं. युवा संघटना स्थापना होत आहे ही माहिती मिळताच मी सावंतवाडीत आलो. तुमच्या सगळ्यांना माझा पाठींबा आहे. व्यवसाय, उद्योगात मराठी माणूस मोठा झालेला दिसावा असं मत त्यांनी व्यक्त केले.
सावंतवाडी वैश्य भवन येथे हिंदू वैश्यवाणी युवा संघटना स्थापनेच्या निमित्ताने शहरातून भव्य बाईक रॅली काढण्यात आली. तद्नंतर अभिनेता अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या हस्ते संघटनेचा शुभारंभ करण्यात आला. हिंदू वैश्यवाणी युवा संघटना स्थापन झाल्याची घोषणा अभिनेता श्री. बेर्डे यांनी केली. तर युवा संघटना अध्यक्षपदी अमित गवंडळकर यांची निवड करण्यात आल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष श्री. भोगटे यांनी केली. याप्रसंगी अभिनेता अभिनय बेर्डे, माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, माजी आमदार राजन तेली, कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, माजी नगराध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर, वैश्यवाणी संघटना जिल्हाध्यक्ष सुनिल भोगटे, तालुकाध्यक्ष रमेश बोंद्रे, महिला अध्यक्षा तनुजा पोकळे, वेंगुर्ला उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, सुनिल कोरगावकर, दिपलक्ष्मी पडते, रमेश भाट, बाबा टोपले आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या सोहळ्याचे औचित्य साधून समाजातील नवनिर्वाचित कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, वेंगुर्ला उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा परिषद सदस्या दिपलक्ष्मी पडते, सावंतवाडी नगरसेवक आनंद नेवगी, सुकन्या टोपले, प्रतिक बांदेकर, कणकवली नगरसेवक जाई मुरकर, वेंगुर्ला नगरसेवक रवींद्र शिरसाट, आंब्रड पंचायत समिती सदस्य नितीन महाडेश्वर, विलवडे पंचायत समिती सदस्य प्रशांत सुकी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. राजेश गुप्ता, बाळासाहेब बोर्डीकर, प्रा. विकास गोवेकर, कल्पना बांदेकर, सागर बांदेकर, ओवी अरूण भिसे, नील बांदेकर, गौरांग भाट, जतीन भिसे, राजदीप बांदेकर, जुईली पांगम, मंदार नार्वेकर, डॉ. प्रसाद नार्वेकर, किर्ती बोंद्रे, पुष्पलता कोरगावकर, सानिका कोदे, उमा टिळवे शिरसाट, शशिकांत नेवगी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी उपस्थित माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर म्हणाले, हिंदू वैश्यवाणी युवा संघटना म्हणजे समाजातील अतिशय महत्वाचा टप्पा आहे. युवकांमध्ये उर्जा असून त्यांच्यातील उर्जा चांगल काम घडवेल. उद्योजक घडविण्याच काम आपल्या माध्यमातून होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माजी आमदार राजन तेली यांनी मनोगत व्यक्त केले. श्री. तेली म्हणाले, बाजारपेठा ओस पडत असताना त्या ठिकाणी व्यापार, उद्योग कसा वाढेल ? याकडे अधिक लक्ष देणं आवश्यक आहे. यासाठी युवा संघटनेन पुढाकार घ्यावा, समाजाची आर्थिक प्रगती कशी होईल यासाठी प्रयत्न करावा असं त्यांनी सांगितलं. तसेच नगरसेवक आनंद नेवगी, जि.प. सदस्य दिपलक्ष्मी पडते, कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, भविष्यात युवक, महिलांसाठी उपक्रम राबविण्याचा उद्देश आमचा आहे. जिल्ह्यात महिला व युवकांची संघटना जिल्ह्यात स्थापन करणार असल्याचे असं मत वैश्यवाणी समाज संघटना जिल्हाध्यक्ष सुनिल भोगटे यांनी व्यक्त केले. यानंतर अभिनय बेर्डे यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढत विजेत्यांना गौरविण्यात आले. यावेळी युवा संघटना अध्यक्ष अमित गवंडळकर यांनी संघटनेच्या माध्यमातून कॅन्सर हॉस्पिटलला १० हजार रूपयांची मदत करत असल्याचे जाहीर केलं. यावेळी उपाध्यक्ष सुनिल मिशाळ, प्रसाद नार्वेकर, शंभू विर्नोडकर, सुनिल मिशाळ, प्रसाद नार्वेकर, श्रेयस मुंज, शैलैश गवंडळकर, नित्यानंद कोरगावकर, प्रशांत वाळके, उमेश स्वार, अण्णा म्हापसेकर, कृतिका कोरगावकर, दिपक म्हापसेकर, राजेश काणेकर, जतिन भिसे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जुईली पांगम, उमा तिळवे शिरसाट यांनी केलं. तर आभार सल्लागार अरूण भिसे यांनी मानले.
