महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड चालू एग्रीकल्चर अध्यक्ष ललित गांधी यांचे आश्वासन…
मालवण (प्रतिनिधी) महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर चे अध्यक्ष सन्माननीय श्री ललित गांधी यांची अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गव्हर्निंग कौन्सिल मेंबर श्री. चंद्रशेखर पुनाळेकर, श्री. महेश मांजरेकर श्री. भालचंद्र राऊत यांनी सदिच्छा भेट घेतली. जिल्ह्यामध्ये व्यवसाय, उद्योग, शेती संदर्भात येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी विशेषतः छोट्या उद्योजकांना व्यवसायिकांना कर्ज मिळण्याच्या दृष्टीने होणाऱ्या समस्या, आंबा बागायतदारांना भेडसावणारा माकडांचा उपद्रव त्यासाठी शासनाच्या माध्यमातून आवश्यकते नियोजन करण्यासंदर्भात चर्चा झाली. यावेळी श्री. ललित गांधी यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक करून त्यासंदर्भात उपायोजना करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या आगामी नियोजित स्मॉल स्केल इंडस्ट्रीज संबंधित सिंधुदुर्गात होऊ घातलेल्या विविध प्रकल्पांसाठी होणाऱ्या नियोजन बैठकीत आपण उपस्थित राहणार असल्याचे प्रतिपादन श्री. गांधी यांनी केले.