⚡वेंगुर्ला ता.१४-: सिंधुदुर्ग जिल्हा आंबा – काजू बागायतदार शेतकरी संघटना व छत्रपती शिवाजी महाराज संघटना यांच्यावतीने शुक्रवारी सकाळी वेंगुर्ला येथे तातडीची बैठक घेऊन कृषी विभागाने तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या आंबा बागांची पाहणी करण्यात येऊन शासनास अहवाल सादर करण्याची कृषी विभागाकडे ठराववजा मागणी करण्यात आली होती. त्यानुसार वेंगुर्ला तालुका कृषी अधिकारी प्रकाश मोहिते, मंडळ कृषी अधिकारी शंकर नाईक, सहाय्यक कृषी अधिकारी श्री. गव्हाणे व जीवन परब यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बागामध्ये पाहणीस शुक्रवारी त्वरित सुरुवात केली. सर्वप्रथम आडेली येथील प्रगतशील शेतकरी प्रकाश महादेव गडेकर यांच्या आंबा कलम बागेत भेट देऊन पाहणी करण्यात आली. तसेच सजा परुळे अंतर्गत भोगवे येथील संजय सूर्याजी सामंत, ज्ञानदेव सामंत, रत्नदीप सामंत, सुधाकर सामंत, महेश सामंत. शेळपी येथील शिवानंद सामंत, कोचरा येथील श्री. पाटकर व श्री. रांगणेकर, वायंगणी येथील
अविनाश दुतोंडकर. तसेच आज शनिवारी मातोंड येथील माजी उपसभापती प्रफुल्लचंद्र परब, पेंडूर येथील शंकर गावडे, तुळस येथील नवनिर्वाचित पं. स. सदस्य शंकर घारे, तुळस येथील संघटना अध्यक्ष शामसुंदर राय आदी शेतकऱ्यांच्या आंबा नुकसानीची पाहणी केली. तसेच काही शेतकऱ्यांच्या काजू बाग नुकसानीची पाहणी करण्यात आली. वेंगुर्ला कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या मागणीची त्वरित दखल घेण्यात आली असून शास्त्रज्ञ, तज्ञ् अधिकारी यांच्यासमवेत उर्वरित शेतकरी यांच्या नुकसानीची पाहणी करण्यात येणार आहे.दरम्यान उभादांडा नवनिर्वाचित जि. प.सदस्य संजय गावडे यांनी आपल्या कामाची सुरुवात करताना शेतकऱ्यांच्या बागांची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
वेंगुर्ला तालुका कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या मागणीची त्वरित दखल…
