Headlines

मालवणात पी. जी. पाटील यांचा सन्मान

मालवण (प्रतिनिधी)

मालवण तालुका शासकीय निमशासकीय कर्मचारी ग्राहक सहकारी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.पी.जी. पाटील यांचा गुरूपौर्णिमेनिमित्त संस्थेचे अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्रीकृष्ण दिगंबर तळवडेकर, संचालक श्री. प्रमोद लक्ष्मण मोहिते, माजी संचालक श्री. के. बी. गांवकर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पी. व्ही. परब व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर यांनी आपले विचार व्यक्त करताना पी.जी. पाटील व त्यांचे सहकारी यांनी स्थापन केलेल्या या संस्थेस ४४ वर्षे झाली आहेत. या संस्थेमुळे अनेक कुटूंबांना रोजगार उपलब्ध झालेला आहे, अपार कष्ट करून हि संस्था स्थापन करणाऱ्या गुरूतुल्य व्यक्तीचा सन्मान करावयास मिळणे हे अभिमानास्पद आहे, असे सांगितले. यावेळी प्रमोद लक्ष्मण मोहिते, के. बी. गांवकर यांनीही विचार मांडले.

या सत्कारास उत्तर देताना संस्थापक अध्यक्ष श्री. पी. जी. पाटील यांनी संस्थेतर्फे गुणगौरव करण्यात आल्या बद्दल आभार मानले, तसेच संस्थेच्या प्रगतीचे आणि विद्यमान संचालक मंडळाच्या कार्याचे कौतुक करत आपले संस्थेला सहकार्य राहील, असे सांगितले.

You cannot copy content of this page